नमस्कार मित्रांनो परत एक नवीन मुद्द्यावर चर्चा करूयात ?? आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण काय केल पाहिजे? आपणाला नक्की काय केल पाहिजे तेव्हा आपल जीवन सुखी व समुद्धी होऊ शकतो. आपण जर या जीवनामध्ये जसे प्राणी जगत आहेत त्याप्रमाणे जगात असेल तर त्यांच्यामध्ये व आपल्या मध्ये अंतर काय असेल आपण कधी विचार केलाय ? जगतात तर सर्वच परंतु आपण कसे व्यवहार करायला पाहिजे, आपली जीवनशैली कशी असली पाहिजे, यावर थोड विचार करा स्वतः मध्ये बदल करायला शिका. आपण या पाच गोष्टी आपल्या जीवनामध्ये जर घेऊन याल तर नक्कीच तुमच जीवन सुखी व समुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही.
या पाच गोष्टी खालीलप्रमाणे.....
१) व्यायाम व जिम ( EXERCIZE & JYM ):-
आपण या धावपडीच्या जीवनामध्ये जीवन जगताना शरीराकडे दूरलक्ष करीत असतो परंतु जसे आपणास राहवयास घर लागतो ते पण आपणास योग्य असले पाहिजे ते तुटके फुटके नसावे त्याचप्रमाणे जर आपले शरीर सुद्धा आहे. म्हणून शरीराला योग्य असा व्यायाम व जिम करायला पाहिजे. त्यामुळे आपले शरीर मजबूत व कठोर होत असते आपला दिवसाची सुरुवात ही छान होत असते. त्याचप्रमाणे आपले आरोग्य हे निठ नेटके राहते. आज दिवसेनदिवस प्रदूषण हे वाढत चालले आहे. त्यासाठी आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणे हे गरजेचे झाले आहे. तुम्ही कमीत कमी आपल्या शरीरासाठी १ तास दिला पाहिजे.
२) भक्ती (DEVOTION) :-
आपण सर्व कामे हे वेळेवर करत असतो परंतु देवाचे नामस्मरण हे जेव्हा आपण दुखात अथवा संकटात करतो त्यापेक्षा आपण देवाचे नामस्मरण दिवसातून फक्त एकदा तरी करतो कारण तो करता धरता असून त्यामुळे आपण इथे पुथ्वीवर येण्याची संधी त्यांनी दिलेली आहे. त्यासाठी त्याचे नामस्मरण करावे. तसेच भक्ती मुळे आपले कल्पना शक्ती सुधारते . आपले मन स्थिर होते. आपण न विचार करता राहूच शकत नाही त्याला जर स्थिर करायचे असेल तर भक्ती मार्ग हा सोप्पा उपाय आहे.
३) परीवार व वेळ ( FAMILY & TIME):-
आपण रोजच्या जीवनात कामामुळे आपण आपल्या परिवाराला वेळ देऊ शकत नाही असे हल्लीचे जीवन झालेले आहे. त्यामुळ तुम्ही तुमच्या परिवारास वेळ द्या. त्यांच्यासोबत तुम्ही त्यांना फिरायला घेऊन जा. घरी गप्पा मारा त्याच्यासोबत वेळ द्या. त्याच प्रमाणे तुम्ही वेळेला महत्व द्या कारण गेलेली वेळ परत येत नाही, किंव्हा विकत घेता येत नाही तुम्ही वेळेचे नियोजन करायला शिका. वेळेचे काम वेळेवर करा आलेली संधी गमवू नका.
४) पैसा(MONEY) :-
पैसे हा महत्वाच घटक झालेलं आहे आपल जीवन जगायचं असेल तर कारण आज तुमच्या काही गरजा हा पैसाच पूर्ण करू शकतो त्यासाठी तुम्ही एक जॉब किंव्हा एक व्यवसाय करणे गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही इनकम सौरसेस बनवून ठेवा तुम्ही आपत्कालीन फंड तयार करून ठेवा. तुम्ही काही पैसे एस आय पी (SIP) मध्ये इनवेस्ट करू शकता त्यांचे रिटर्न खूप छान असतात.
५) फिरणे (TRAVEL):-
तुम्ही आज काल इतक सार पैसे कमवले परंतु तुम्ही हा जग बघितलं नाही, खूप एन्जॉय केल नाही, तर तुमच सर्व फिरणे राहून जाईल तुम्ही आपले जीवन जगले पाहिजे पण फक्त काम न करता तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरून येऊ शकता तुमच्या परिवारास तुम्ही फिरायला घेऊन जा. त्यांना पर्यटन स्थळे दाखवा. दर्शन करून या!!! त्याच निमित्त्याने तुमचा वेळ त्याच्यासोबत स्पेंड देखील करता येईल.
या सर्व गोष्टी करतांना स्वतः ची काळजी घ्या यांचे नियोजन करा. त्यानुसार तुम्ही काम करा. पैसे हे तुमचे योग्य वेळी योग्य ठिकाणी बचत करून ठेवा.
माहित आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा.
धन्यवाद !!!!!
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!