उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी ) परीक्षा फेबुवारी - मार्च २०२४ च्या निकालाबाबत महत्वाची घोषणा झालेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर , मुंबई, कोल्हापूर, अमरावती , नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागाच्या फेब्रुवारी - मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक १२ वी परीक्षेचा निकाल मंगळवारी दिनांक २१/०५/२०२४ रोजी दुपारला ठीक १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल.



केव्हा व कोठे बघायचे निकाल ?

खालील संकेतस्थळावर तुम्हाला १२ वी चा निकाल बघता येईल 

१. maharesult.nic.in

२. http://hscresult.mkcl.org

३. www.mahahsscboard.in

४. https://results.digilocker.gov.in

५. www.tv9marathi.com

६. http://results.targetpublications.org