नमस्कार मंडळी , विद्यार्थी मित्रांनो परत एका नवीन ब्लॉग मध्ये आपल स्वागत आहे. आपण १ ते १० वी पर्यंत मध्ये खेळत रमत शिकत असतो. परंतु त्यानंतर चिंता येते जेव्हा आपण आपली १० वी ची परीक्षा देतो तेव्हा किंव्हा १२ वी ची परीक्षा देतो तेव्हा कि आपण नेमक कोणत शिक्षण घेतल पाहिजे. कि आपण आपल भविष्य उज्ज्वल करू शकतो. त्यासाठी शिक्षण घेत असतांना अनेक मार्ग आहेत.

 


      जसे कि, कला, वाणिज्य व विज्ञान या प्रमुख शाखा आहेत. त्यातून काही विद्यार्थी विज्ञान शाखा घेतात काही वाणिज्य तर काही कला शाखा घेतात. परंतु असे म्हणणे योग्य नाही कि विज्ञान शाखा घेतलेले विद्यार्थी हुशार असतात. काही कारणस्तव ते विज्ञान शाखा घेऊ शकत नाही. काही विद्यार्थी कला शाखा घेऊन सुद्धा ते आपल्या जीवनात यशस्वी होत. असतात.

 

या मार्गाने जा तुम्ही तुमच्या यशापर्यंत नक्की पोहचाल.....

उदाहरणार्थ,

      तुम्ही एका बस मध्ये अथवा रेल्वे मध्ये बसले आणि बसून प्रवास करत आहे निरतर परंतु तुम्हाला नेमके माहित नसेल कि तुम्हाला कुठे जायचे आहे? तर तुम्ही तिथे पोहचू शकणार नाही. त्याच प्रमाणे आपण शिक्षण घेत असतांना सुद्धा हल्लीची मुल-मुली हेच करत असतात. नुसत शिक्षण घेत असतात. परंतु त्यांना नेमके ध्येय हे माहित नसते. त्यामुळे ते आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकत नाही. त्यासाठी तुम्ही दहावी किंव्हा बारावी होताच तुम्हाला तुमचे ध्येय हे ठरवून घ्यायला पाहिजे कि तुम्हाला नेमके काय करायचे आहे. तुम्हाला कशाची आवड आहे. तुम्ही कशात आपले जीवन घडवू शकता.

 

या तीन स्टेप्स फॉलो करा तुम्हाला तुमचे ध्येय नक्कीच मिळेल......

 

१)      तुमचे ध्येय हे ठरवून घ्या ( To Decide you Desire Goal) :-

ध्येय ठरवून घेणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला कशाची आवड असू शकते कोणाला जिल्हाधिकारी, तहसीलदार , अनेक शासकीय अधिकारी तसेच कुणाला गीतकार संगीतकार कुणाला खेडाळू , डान्सर  मध्ये आवड असते ते तुम्हाला ज्या गोष्टी मध्ये आवड आहे तेच करायला शिका. व आपल्या ध्येयावर ठाम राहायला शिका.

२)      तुमच्या ध्येयासाठी प्रयत्न करा :-

फक्त आपले ध्येय ठरवून होत नाही त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे जीवनात हार जीत तर होतच असते तुम्ही तुम्हचे प्रयत्न करणे कधी सोडू नका. तुम्ही तुमचे ध्येय जोपर्यंत गाठत नाही तोपर्यंत हार माणू नका.

३)      तुम्ही तुमच्या कामासाठी १००% द्या:-

तुम्ही तुमच्या कामासाठी जोपर्यंत १००% देत नाही तोपर्यंत ते साध्य होणार नाही त्यासाठी वाटतेल ते पर्यंत करा. तुमचे प्रयत्न चालू ठेवा, खचून जाऊ नका ( Make a practice make a perfect person) .                                                            


खालील चार्ट तुम्हाला मदत करेल कि १० वी १२वी नंतर कुठे प्रवेश घ्यावे.