पळून जाऊन लग्न करताय एकदा विचार करा

आज मुलं- मुली अलीकडे कसलाही विचार न करता शाळा, महाविद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील मुली - मुल प्रेम करत असतात. त्यातून फक्त प्रेम करून होत नाही ते निभावता पण आले पाहिजे तसेच निभावून कोण घेऊ शकतो जो वक्ती अथवा ती वक्ती कि मनातून एखाद्याला पसंत अथवा त्यांची मन जुळले आहेत. जे कि एका-मेकांना समजून घेऊ शकतात. सुख असो किव्हा दुख असो. ती वक्ती कधीच साथ देऊ शकत नाही जे कि दुसऱ्याची पर्वा अथवा चिंता करते. म्हणून जरा विचार करा कि आपण ज्या वक्तीवर प्रेम केल आहेत त्या वक्तीला आपण साथ देऊ शकतो कि नाही नाहीतर अस नेहमी होत असते. त्याचं नेहमीच असत "मला तुझी खूप आठवण येत आहे" या दोन चार शब्दांनी त्यांची अथवा तिची जिंदगी बरबाद होत असते. 
आज विचार करून बघा कि आई-वडील त्या मुला-मुलीसाठी रात्र दिवस राबत असतात. ते नेमके कुणासाठी करत असतात. आज बघितलं तर सार काही आपल्या पोटाच्या मुल-मुलींसाठी करत असतात म्हणून माझ एक म्हणन आहे कि त्यांची जी मेहनत तुमच्यासाठी केली आहे. त्याला वाया घालवू नका. आपल्या आई-वडील यांचा मान खाली जाईल असं काही करू नका. 

प्रेम करणे वाईट अथवा बेकार आहे अस नाही परंतु आपण ज्या वक्तीवर करत आहोत ते कसे , कुठे त्याचं बोलन , चालन कस आहे? ती वक्ती आपल्याला जोडीदार होईल का ? व ती अथवा तो वक्ती साथ देईल का? याचा नक्की विचार करा. 

आज पैसा एक महत्वाच विषय आज बघितलं तर पैसे किती कमावतो , किती  शेती आहे? परतू अस कोणी म्हणत नाही मी ती अथवा तो आपण सोबत कमवू तू पण हातभार लाव आज ना उद्या ते दोघे अथवा तो पण खूप असेल.

पैसे खूप असतील परंतु त्यांच्या कडे ते एन्जॉयमेंट करण्यासाठी वेळ नसेल तर हे सर्व वर्थ आहे असे आपले म्हणणे आहे. सर्वांच्या आवडी निवडी वेग वेगळ्या असतात परंतु ती अथवा तो एका मेकांना वेळ दिल पाहिजे किव्हा तिच्या अथवा त्याच्या सामोर असायला पाहिजे. 

प्रेम केल तर पळून जाऊन लग्न केल पाहिजे अस नाही आपण एकदा घरी सुद्धा विषय काढून आपले म्हणणे थोडक्यात सांगितले पाहिजे कि आपण कितीपत योग्य निर्णय अथवा काम केल आहे. हे माहित होईल. 

आपल्या आई-वडील इतक प्रेम कुणीच करू शकत नाही कारण त्यांनी तुम्हाला लहानच मोठ केल असत तुमच्या चालन- बोलन अथवा इतर उपक्रम तुमची हसू रडू त्यांनीच तुम्हाला या जगाची सैर केलीली आहे. जर त्यांनी तुम्हाला या जगात आणल आहे. हे विसरून चालणार नाही. त्यांच्या मनाला ठेच पोहचणार नाही असं काही करू नका. 

आज मुल- मुली परवानगी न घेता हवे ते निर्णय घेतात. तर घेतलेले निर्णय बरोबर असतील तर ठिक नाही तर त्याचा त्रास तुम्हाला आयुष्यभर होत असतो. किंव्हा तुम्हाला आयुष्भर पण आनंद घेता येते.

आई - वडील जिथे पण लग्न करतील ते तुमचा विचार करूनच देत असतात. फक्त फरक इतकचं आहे की ती अनोळखी व्यक्ती तुम्हाला समजून घ्यायला वेळ लागेल.
पण प्रेम केलं तर त्या वक्तीला तुमची जीवन साथी करा.
नाहीतर ज्याच्याशी तुमचं लग्न झालं त्याच्याशी प्रेम करा.

एकदा स्वतःच मनाला पण विचारून निर्णय घेतला पाहिजे. जे आपण केलं ते योग्य आहे का? तो नसेल तर ते सिद्ध करायला लागा की घेतलेला निर्णय योग्यच कसा होता? तो सिद्ध करा..........



   

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या