नमस्कार मित्रांनो , स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये या ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत कि जात प्रमाणपत्र म्हणजेच त्यालाच Cast Certificate असे सुद्धा म्हणतो. ते नक्की कसे काढायचे ? त्याचे नक्की उपयोग काय ? ते काढण्याकरिता कोणते कागदपत्रे लागतात ? कुठे अर्ज करायचा ? ........
जात प्रमाणपत्र चे नक्की उपयोग म्हटले तर खूप शासकीय कामाकरीता केला जातो. Open Cast सोडून इतर जातीकरीता जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. जसे ST , SC, VJNT, OBC व SBC या जातीकरीता जात प्रमाणपत्र आवश्यक आहे. शिषवृती योजना , घरकुल योजना , तसेच स्पर्धा परीक्षा फॉर्म भरणे , जातीतील आरक्षण , तसेच निवडणूक विभाग , अशा अनेक शासकीय कामाकरीता जात प्रमाणपत्र ची आवश्यकता आहे. म्हणून जात प्रमाणपत्र काढून ठेवावे.
जात प्रमाणपत्र काढण्याची सर्व प्रकिया आत्ता Online झालेली आहे. ते काढण्याकरीता लागणारे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू सेवा केंद्र, त्यालाच महा इसेवा केंद्र म्हणतात. त्या ठिकाणी जाऊन त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
जात प्रमाणपत्र काढण्याकरीता लागणारे कागदपत्रे
१) एक रंगीत पासपोर्ट साईझ फोटो
२) वंशावळ
3) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी. सी.) मुलाचे
४ ) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी. सी.) वडिलांचे किंव्हा अशिक्षित दाखला किंव्हा मृत्यू प्रमाणपत्र किंव्हा सातबारा
५) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र ( टी. सी.) आजोबा किंव्हा अशिक्षित दाखला किंव्हा मृत्यू प्रमाणपत्र
६) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९६७ पूर्वीचा OBC व SBC करिता )
७) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९६१ पूर्वीचा VJNT करिता)
८) ग्रामपंचायत नमुना ८ ( १९५० पूर्वीचा SC व ST करिता)
९) अधिकार अभिलेख किंव्हा पी वन किंव्हा कोतवाल पंजी किंव्हा किष्टबंदी
१०) रेशन कार्ड
११) आधार कार्ड मुलाचे
१२) आधार कार्ड वडिलांचे
१३) गृहकर पावती
१४ ) घराच्या व्यक्तीचे जात प्रमाणपत्र ( असेल तर )
कोणत्या जातीसाठी कोणत्या वर्षीचा पुरावा लागतो ?
SC/ST करीता दिनांक १० ऑक्टोबर १९५० चा पुरावा
VJNT करीता दिनांक २१ नोव्हेंबर १९६१ चा पुरावा
OBC/SBC करीता दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ चा पुरावा
जात प्रमाणपत्राकरीता कुठे अर्ज करावा ?
सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच्या सेतू सेवा केंद्र, त्यालाच महा इसेवा केंद्र म्हणतात. त्या ठिकाणी जाऊन त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!