दहावी-बारावी झालीय हि कागदपत्रे तुमच्या जवळ असायलाच पाहिजे? लगेच काढून ठेवा. These documents of passing 10th-12th must be near you?

        नमस्कार मित्रांनो परत एक नवीन ब्लॉग मध्ये आपल स्वागत आहे. तुमची दहावी किंव्हा बारावी झाली , असेल किंव्हा होत असेल तर तुमच्या जवळ काही महत्त्वाचे कागदपत्रे असायलाच पाहिजे. नसेल तर ते तुम्हाला काढूनच ठेवायचे आहेत कारण तुम्ही जेव्हा दहावी बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल किंव्हा तुम्हाला बारावी नंतर स्पर्धा परीक्षा द्यावयाच्या असतील तर तुम्हाला हे कागदपत्रे आवश्यक आहे. त्यासाठी हे कागदपत्रे असायलाच पाहिल. चला तर बघूया कोणते कागदपत्रे काढून ठेवायचे आहे. 



पुढील कागदपत्रे लगेच काढून ठेवा.

१)जात प्रमाणपत्र (Caste Certificate) :-

                                                        तुमची जात SC, ST, OBC , VJNT व SBC असेल तर तुम्हाला जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. तुम्हाला शासकीय कामाकरीता तसेच शालेय कामाकरीता त्याचा नक्कीच उपयोग होईल. स्पर्धा परीक्षा मध्ये जातीतील आरक्षण घेण्याकरीता जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 


२) वय अधिवाय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ( Age Domicile And Nationality) :- 

                                                      वय अधिवाय व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र हा एक महत्वाचे कागदपत्र आहे यात वयाचा व पत्ताच पुरावा असतो. याचा उपयोग शासकीय व शालेय तसेच वयाचे दावे करतांना याचा उपयोग होत असतो. हे तुम्ही नक्की काढून ठेवा. 


३) नॉन क्रेमिलेयर  ( Non cremilayer) :- 

                                                       तुम्ही  OBC , VJNT व SBC या प्रवर्गात मोडत असेल तर तुम्हाला नॉन क्रेमिलेयर  ( Non cremilayer) काढणे आवश्यक आहे. SC व ST जातीला वगळून इतर जातीकरीता काढणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे आहे. तसेच ते मुद्दतीत असणे आवश्यक आहे. असेल तर ते तुम्हाला रीनेवल करायचे आहे. 


४) मिळकत प्रमाणपत्र ( Income Certificate) :- 

                                                        दहावी बारावी नंतर महाविद्यालय प्रवेश घेत असतांना तसेच शिषवृत्ती फॉर्म भरतांना तुमच्या जवळ काढून ठेवणे खूप आवश्यक आहे. नाहीतर वेळोवेळी धावपळ होते. त्यासाठी तुम्ही हे काढून ठेवा. 


५) आधार कार्ड अपडेट :- 

                                     तुमचा आधार कार्ड अपडेट नसेल तर तुम्ही तो अपडेट करून घ्या जवळच्या आधार केंद्र वर जाऊन त्यात फोटो पत्ता तसेच नाव हे अपडेट करून घ्या हे खूप महत्वाचे आहे. 



वरील कागदपत्रे कुठे काढायचे ?   

        जवळच्या सेतू सुविधा केंद्र तसेच आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन तुम्ही हे सर्व कागदपत्रे काढून घेऊ शकता यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त १५ दिवस लागतील त्यासाठी तुम्ही पूर्वीच काढून घ्या. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या