२ ऑक्टोबर हा दिवस सार्वजनिक स्वच्छता दिवस म्हणून पाळला जातो. त्या दिवशी आपण सर्वजण सार्वजनिक स्वच्छता मोहीम सुद्धा राबवत असतो. आपण थोड विचार की स्वच्छता आपण त्याचं दिवशी पर्यंत न ठेवता किमान आपलं परिसर प्रत्येकाने स्वच्छ व नीट नेटक ठेवावं. जर प्रत्येकाने असं केलं तर आपणाला स्वच्छतेचा प्रश्नच पडणार नाही. त्यामुळे आपलं गाव पण सुधारेल व आपल्या गावाची उन्नती सुद्धा होईल.
स्वच्छतेविषयी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगितेत सांगतात
गाव हा विश्वाचा नकाशा | गावावरून देशाची परीक्षा||
गावची भंगता अवदशा | येईल देशा||
म्हणून आज गावात सुधारण्याची आवश्यकता आहे. कारण त्यावर देशाचे भवितव्य ठरते. एकदा नक्की विचार करा!! की भविष्यात कोरोना सारखे किंव्हा इतर रोग यांच्याशी सामना करावा लागणार नाही याचं विचार करा.
स्वच्छता हा एक महत्वपूर्ण विषय असून त्यामुळे भारत सरकार स्वच्छ भारत अभियान दर वर्षी २ऑक्टोबर ला राबवत असते. त्यामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जाते.
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!