नमस्कार मंडळी परत एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत करतो आज घेऊन आलोय तुमच्या साठी एक नवीन माहिती !!! कि तुम्हाला जर या चुका माहिती नसतील आधार कार्ड वरील तर तुम्ही या चुका लक्षात घेऊन ते तुम्हाला लगेच दुरस्त करून ठेवायच्या आहेत. त्या तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जाऊन तुम्हाला दुरस्त करता येईल.
आधार कार्ड एक ओळखीचा पुरावा आहे. तसेच तुम्हाला बँक असो कि शासकीय कामे तुम्हाला आधार कार्ड हे मागवले जाते ते तुम्हाला योग्य रित्या अपडेट असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड काही चुकीचे आहे का ते कसे त्यात बदल करता येईल ते बघूया.
या चुका चेक करा तुमच्या आधार कार्ड वर :-
१) तुमचे नाव :-
सर्वांना स्वतःचे पूर्ण नाव चेक करायचे आहे कि बरोबर आहे का? त्यावरील इंग्लिश मधील स्पेलिंग सुद्धा चेक करून घ्यायची आहे. तसेच मराठी मधील नाव सुद्धा चेक करून घ्यायची आहे. त्यात काही चुकीचे नाव असेल तर तुम्ही तुमची टी सी किंव्हा मतदान कार्ड किंव्हा नावाचे प्रूफ घेऊन जाऊन तुम्ही तुमचे नाव हे अपडेट करून घ्या.
२) मोबाईल नंबर :-
आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आज आवश्यक झालेले आहे त्यासाठी तुम्ही लगेच आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करून घ्या त्यामुळे तुम्ही अनेक कामे तुम्ही तुमच्या मोबाईल वरून देखील करू शकता. त्याचप्रमाणे तुमचे मोबाईल नंबर लिंक असेल तर तुम्हाला तुमचे आधार कार्ड सुद्धा घरबसल्या काढू शकता. तसेच काही ठिकाणी आधार प्रामाणीकरण सुद्धा मोबाईल नंबर लिंक असेल तुमच्या आधार कार्ड ला तर ते सुद्धा करू शकता अशा अनेक फायदे आहेत. त्यासाठी तुम्ही लगेच अपडेट करून घ्या. तसेच काही लोकांनी आपले मोबाईल नंबर बदल केला असेल तर तुम्ही आपल्या आधार कार्ड वरील मोबाईल नंबर बदल करून घ्या.
३) फोटो व बायोमट्रिक अपडेट:-
आधार कार्ड वरील तुमचे फोटो खूप पूर्वीचे असेल तर तुम्ही ते नवीन फोटो अपडेट करा. तसेच तुमचे बोटाचे ठसे लागत नसतील तर ते सुद्धा अपडेट करून घ्या. ते खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचे कामे जलद गतीने होतील.
४) पत्ता ( Address) :-
तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणच पत्ता असणे आवश्यक आहे काही लोक स्तलांतर करत असतात परंतु त्यावर पत्ता पूर्वीचाच असतो तो तुम्ही बदलवून घ्या त्या साठी तुम्हाला विद्युत बिल , रेशन कार्ड सारखे पत्त्याचे प्रूफ जोडू शकता जर तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तर तो पत्ता तुम्ही घरबसल्या देखील बदल करू शकता. तसेच आधार कार्ड वर तुम्हाला चेक करायचे आहे कि त्यावर पत्ता च्या ठिकाणी ( S/O, D/O, W/O, C/O ) हे असणे आवश्यक आहे नसेल तर ते तुम्ही लागेल करून घ्या त्यामुळे जर तुमच्या पत्त्याच्या ठिकाणी हे असे लिहून नसेल तर तुम्ही ऑनलाईन वाहन परवाना तसेच पी एम विश्वकर्मा असे अनेक फॉर्म भरता घेणार नाही त्यासाठी ते अपडेट करून घ्या.
५ ) जन्म तारीख :-
तुम्ही तुमची आधार कार्ड वरील जन्म तारीख चुकीची असेल तर पुढील जसे कि पन कार्ड कागदपत्रे सुद्धा आधार प्रमाणे होईल त्यासाठी तुम्ही तुमचे आधार कार्ड वरील जन्म तारीख बदल करून घ्या. त्यासाठी तुम्हाला जन्म दाखला हा आधार केंद्रावर घेऊन जायचे आहे.
हि माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा धन्यवाद !!!!!
0 टिप्पण्या
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंव्हा शासनाशी संबधित नाही. कृपया याला Official वेबसाईट म्हणून मानू नका आणि खाली comment मध्ये आपला संपर्क, आधार क्रमांक , मोबाईल क्रमांक यासारखी व्यक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजना किंव्हा इतर तक्रारी यावर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही प्रकाशित केलेली माहिती संबधित विभागाच्या Official संकेतस्थळावर अथवा अधिकारी भेट देण्याची विनंती करतो. धन्यवाद!